शांताबाई बनकर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्यावहिल्या चरित्रकार
फुले दाम्पत्यांचं चरित्र लिहिलं जायला विसावं शतक उजाडावं लागलं. पं. सी. पाटील यांनी १९२७मध्ये लिहिलेलं पहिलं उपलब्ध फुलेचरित्र आहे. फुलवंताबाई झोडगे यांनी १९६६मध्ये लिहिलेलं ‘साध्वी सावित्रीबाई फुले’ हे पुस्तक सावित्रीबाईंचं पहिलं चरित्र मानलं जात होतं. मात्र शांताबाई बनकर यांनी १९३९मध्ये लिहिलेलं चरित्र मिळालं असून ते पुणे विद्यापीठानं नुकतंच पुनर्प्रकाशित केलं आहे.......